‘गुळवेल’ ही आयुर्वेदातील महत्त्वाची वनस्पती आहे. गुळवेल या वनस्पतीस ‘अमृता’ हे नाव देखील आहे. कारण, ती अमृतासमान गुणकारी आहे. गुळवेल माणसाच्या अगणित व्याधींना दूर करून त्यास दीर्घायुषी करते.

करोनापासून दूर राहण्यासाठी “#गुळवेल” गुणकारी #पेय. गुळवेलाचे सेवन केल्याने बऱ्याच #आजारांपासून #बचाव करता येतो. #ताप, #सर्दी आणि #खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी #गुळवेल #रामबाण #उपाय आहे. #रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या गुळवेलाचे आश्चर्यकारक #फायदे. #घरघुती उपाय करून तुम्ही स्वतःचं #आरोग्य उत्तम ठेऊ शकता.

गुळवेल कोणत्या आजारावर फायदेशीर ठरते?

• डोळ्यांच्या व कानाच्या आजारावर
• उचकी व उलटी थांबवण्यासाठी
• टि.बी.
• कफ
• कावीळ
• मधुमेह (Diabetes)

• मुञविकार
• कुष्ठरोग (Leprosy)
• ताप
• एसिडिटी
• ह्रदय स्वस्थ ठेवण्यासाठी
• लहानमुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी

(ज्यांच्या शरीरात साखरेचे प्रमाण कमी आहे (low diabetes), व गर्भवती महिलांनी गुळवेलचे सेवन करू नये.)

सेवन विधी

गुळवेलचे खोड औषधीकरिता उपयोगात आणतात. करंगळीएवढ्या जाडीचे एक फूट लांब कांड घेऊन त्यास कुटावे. त्यात ५-१० तुळशीची पाने घालावी व २ कप पाण्यात उकळावे. १/४ म्हणजेच १/२ कप होईपर्यंत आटवावे, नंतर गाळून १ चमचा मध घालून प्यावे. दिवसातून एक किंवा दोन वेळा घ्यावे.बाजारामध्ये गुळवेल सत्व, अमृतारिष्ट इत्यादी नावाने गुळवेल उपलब्ध आहे, परंतु ताजी गुळवेल वनस्पती अधिक प्रभावी आहे.