लॉकडाऊनमधून जीवनावश्यक वस्तुंना वगळण्यात आले आहे. मात्र जिल्हाबंदीमुळे या वस्तूंची वाहतूक करणे कठीण काम आहे. त्यात नागरिकांना वेळेवर अन्नधान्य पोहचवण्याची आवश्यकता होती. अशा प्रसंगी रेल्वेने मालवाहतुकीला गती दिली. यामुळे महिनाभरात कोल्हापूर गुड्स मार्केटमध्ये रेल्वेद्वारे होणारी अन्नधान्याची आवक जवळपास दुपटीने वाढली आहे. या तुलनेने जिल्ह्यातुन अन्य जिल्ह्यात होणाऱ्या मालवाहतुकीची घट झाली आहे.
पुढारी, कोल्हापूर