कोल्हापुरात शिवसेनेतर्फे सर्व शहरवासीयांना भाजीपाल्याचे वाटप करण्यात येणार आहे. विशिष्ट्य राहणीमान वा गट असा फरक न करता सर्वानाच भाजीपाल्याची गरज असल्याने शहरवासीयांना भाजीपाला वाटप करण्यात येणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
भाजीपाला वाटपासाठी दि २८ रोजी शिवसेना शहर कार्यालयात सहा ट्रकहून अधिक भाजीपाला आणण्यात आला. या भाजीपाल्याचे वर्गीकरण व त्यांचे किट तयार करण्यासाठी शंबरहुन अधिक कार्यकर्ते दिवसभर राबत होते. आज बुधवार पासून त्यांचे प्रभागवार वाटप करण्यात येणार आहे. कार्यकर्ते घरोघरी जाऊन या भाजीपाला किटचे वाटप करणार आहेत