कोल्हापूर शहरातील कनाननगर येथे दि. ३० रोजी कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने हे क्षेत्र प्रतिबंधित घोषित करुन हा परिसर चारही बाजूने सिलबंद करण्याचे आदेश करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी आज दिले.

सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्ती त्याच्या संपर्कात आल्याने होतो. महानगरपालिका हद्दीमध्ये कनाननगर येथे एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे.

भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडील दिशा निर्देशानुसार कनाननगर प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या परिसराच्या चारही बाजूच्या सीमा पुढील आदेश होईपर्यंत सिलबंद करण्यात आल्या असून प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे .