कोल्हापूरात काल रात्री ११ वाजता आणखीन दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळले. कोरोनाने केली राधानगरी तालुक्यात एन्ट्री. राधानगरी तालुक्यातील दोघांना कोरोनाची लागण. ११ वर्षांच्या मुलीला आणि तिच्या ३५ वर्षांच्या वडिलांना कोरोनाची लागण. मुंबईहून कोल्हापूरात परत आलेल्या राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हारवडे गावातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट. मुलीच्या कॅन्सरवरील उपचारासाठी वडील, मुलगी आणि इतर दोन नातेवाईक असे चौघे गेले होते मुंबईला त्यातील दोघांना लागण झाल्याचे स्पष्ट.
एकाच दिवशी कोल्हापूरात ४ कोरोना रुग्णांची वाढ. कोल्हापूरातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २९ वर. आत्तापर्यंत जिल्ह्यात 10 जणांना डिस्चार्ज तर एकाचा मृत्यू