सिंचन गृह निर्माण सहकारी संस्था, संभाजी नगर, कोल्हापूर येतील रहिवासी यांनी एकत्र येऊन गरजू व्यक्तींना मदत कारणाकरिता श्री महालक्ष्मी किराणा स्टोअर, राजाराम पार्क येथून २१७ तांदूळ विकत घेऊन माननीय श्री. किरण नकाते साहेब (नगरसेवक), संभाजी नगर यांच्याकडे दिला. या कार्यासाठी बीआर पाटील, यशवंतस. उमराणी, संग्राम भोसले, संदीप गवळी, प्रवीण बैले, सुहास आयरे, आनंदराव कांबळे, दिनेश ओतारी, अशोक काटकर, प्रमोद कुलकर्णी, एन. डी. कुलकर्णी, परमाळे, श्रीनिवास तगारे एकत्र येऊन वारे वसाहत या ठिकाणी जमा झाले.