मास्क व हँडग्लोज न घालता भाजी विक्री करणाऱ्या २३ व्यापाऱ्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी शंभर रुपयाप्रमाणे २,३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तपोवन, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शिंगोशी मार्केट येथील व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.