महाविकास आघाडी सरकारने कोरोनामुळे अडकलेल्या ऊसतोड बांधवांना त्यांच्या स्वगृही पाठविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यानुसार आज कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसतोड बंधू-भगिनींना त्यांच्या घरी सुखरूप पाठविण्यास सुरवात करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील साखर कारखाने व प्रशासन यांच्या सहकार्याने कोल्हापुर जिल्ह्यातील एकूण १४,२३९ कामगारांना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये योग्य ती काळजी घेऊन पाठविण्यात येणार आहे. यामधील महिला व बालकांसाठी विशेष ५४ एसटी बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
ना. सतेज (बंटी) डी. पाटील
पालकमंत्री, कोल्हापूर