मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेत असणाऱ्या कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हि व्यक्ती १७ एप्रिल पासून कोविड हॉस्पिटल, मिरज येथे उपचार घेत होती. या व्यक्तीवर उपचारासाठी हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने शर्तीचे प्रयत्न केले. तथापि आज (दि. १९) रोजी सायंकाळी या व्यक्तीने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. या मृत्यूने सांगलीत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे