केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे, संबंधित पोलीस कर्मचारी आपल्या गावी गेले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपाचारासाठी रुग्णालयात गेले असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याची निष्पन्न झाले आहे. यामुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण पाहायला मिळत आहे.