खिद्रापूर, ता. शिरोळ येतील मशिदीत होम क्वॉरंटाईन असणाऱ्या पाच जणांनी राजापूर बंधाऱ्यामार्गे गुपचूप पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा हा डाव फसला. खिद्रापूर कोरोना प्रतिबंधक ग्रामस्तरीय समितीने वेळीच या होम क्वॉरंटाईन लोकांबाबत प्रशासनांना कळविले. त्या सर्वाना सक्त ताकीद देऊन परत येण्यास भाग पडले.