शहरात यापुर्वी सापडेले कोरोनाग्रस्त दोन रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर तिसऱ्या रूग्णही कोरोनामुक्त झाला असतानाच आज शहरातील नागाळा पार्क परिसरातील एका 38 वर्षीय तरूणाचा कोरोनाचा अहवाल पॉझीटीव्ह आला. या तरूणांसह अन्य तिघे असे चौघेजण आजच इराणहून कोल्हापुरात आले होते, यातील तिघांचा अहवाल मात्र निगेटीव्ह आला आहे.
दरम्यान, शहरात तब्बल 19 दिवसांनी कोरोना पॉझीटीव्ह सापडल्याने शहर कोरोनामुक्त झाल्याच्या आनंदात असलेल्या शहरवासियांना धक्का बसला आहे. या तरूणाच्या स्वॅबची चाचणी कोल्हापुरातील शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत करण्यात आली आहे.
निवास चौगले, सकाळ