इराणहून परतलेल्या तरुणाचा शनिवारी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, क्रॉस तपासणीनंतरच त्याचा अंतिम अहवाल स्पष्ट होईल असे राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी सांगितले.

हा तरुण नागाळा पार्क येथील महावितरणच्या वीज उपकेंद्राच्या परिसरातील आहे. कोल्हापूर शहरातील आढळलेले तिन्ही रुग्ण कोरोनमुक्त झाले असतानाच शहरात आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या १२ वर गेली आहे