लोकडाऊनमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवारी पारंपरिक पद्धतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात येणार आहे. शिवाजी चौक येथे सकाळी दहा वाजता महापौर निलोफर आजरेकर, आ. चंद्रकांत जाधव, माजी आ. राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवराय यांना अभिवादन करण्यात येणार असल्याचे आयोजक आर. के. पोवार व शहाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष उदय शिंदे यांनी सांगितले
पारंपरिक पद्धतीने आज शिवजयंती साजरी होणार

You must be logged in to post a comment.