मिसळकरिता कोल्हापूर हे शहर प्रसिद्ध आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक प्रसिद्ध मिसळ कोल्हापूरातील बावडा येथे मिळते. आज दि :- ०४/०६/२०२२ रोजी अभिनेत्री मौसमी तोंडवळकर यांनी जगप्रसिद्ध हॉटेल बावडा मिसळला भेट दिली त्यांची अबोली नावाची मालिका स्टार प्रवाहावर सुरु आहे. बावडा मिसळचा मनसोक्त आस्वाद घेतला आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अशी की आम्ही सर्व फॅमिली आईकडे माहेरी जात असताना या रस्त्यावरून बरेच वर्षे येत जात असतो पण हॉटेल बावडा मिसळ येथे आम्ही कधी का नाही आलो याचा प्रश्न मला मिसळ खाल्यानंतर पडला आहे.


कारण ९९ वर्षे पूर्ण झाली या मिसळला त्याच कारण आज मला मिसळ खाल्ल्यानंतर कळालं, अत्यंत युनिक अशी चव आहे, स्पेशली मिसळमधील कट हा अत्यंत सुंदर आहे, मालवणी मच्छी करी किंवा मालवणी रस्सा जसा असतो आमचा त्याच्या जवळ पास मला जाणारा असा वाटला शतकमोहोत्सवानिमित्य मला वेळ मिळाल्यास मी जरूर उपस्थित राहीन, आता *येत्या जानेवारी महिन्यात हॉटेल बावडा मिसळला १०० वर्षे सुरू होतात*, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.👏😊