राष्ट्रभक्ती आणि राष्ट्ररक्षण करायचे असेल तर राष्ट्राचा अमुल्य ठेवा जतन संवर्धन करणे काळाची गरज आहे.
गडकोट, ऐतिहासिक वाडे, ऐतिहासिक वस्तू, शस्त्र, ग्रंथ, कागदपत्रे हीच तर आमची प्रेरणास्थाने.पाश्चात्य देशांची प्रमुख बलस्थाने म्हणजेच वस्तुसंग्रहालये आहेत इंग्लंडमधील लंडन सारख्या शहरात सत्तर सरकारी व खासगी वस्तुसंग्रहालये आहेत व ते त्या देशाचं प्रमुख उत्पन्नस्तोत्र आहे .
भारतासारख्या इतिहास घडवलेल्या देशात या ठेव्याच्या जतन संवर्धनाबाबत फारच उदासीनता दिसते लोकप्रतिनिधींना सुध्दा या शौर्यशाली गाथेचा विसर पडला आहे.
तरूण पिढी तासंतास संगीताच्या ठेक्यावर नाचून अंगातील रग जिरवताना दिसत आहे त्यांना पावनखिंडीत एकवीस तास चाललेल्या रणसंग्रामाचा विसर पडलेला आहे.मद्यालयात बसून मद्यप्राशन करून सिगरेटच्या थोटकासारखे आयुष्य संपवण्यात त्यांना धन्यता आहे . पारंपारिक खेळांची जागा पाश्र्चात्यांनी घेतली आहे.
अनेक वर्षे अखंडितपणे मी या कार्याशी प्रामाणिक आहे या वस्तूंच्या जतन संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे.या कामी मला खरी प्रेरणा माझे गुरूवर्य कै शामराव जाधव व माझे वडील थोर विचारवंत कै पंडितराव सावंत यांच्यामुळेच मिळाली आहे.
बहुत काय लिहिणे वस्तुसंग्रहालय दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.जय शिवराय.
नाना सावंत साळुंखे शिवगर्जना प्राचीन युध्दकला प्रशिक्षण संस्था कोल्हापूर.