शालेय विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये ही निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. सद्यस्थितीत सर्व विद्यार्थी संचार बंदीमुळे आपल्या घरीच आहेत. त्यांच्या मेंदूला व कल्पकतेला चालना देण्यासाठी तसेच त्यांच्या कडील उपलब्ध असलेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी संघटनेच्यावतीने ही निबंध स्पर्धा इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली आहे. निबंध स्पर्धा कोल्हापूर जिल्हा मर्यादीत आहे याची नोंद घ्यावी .
या स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे
- माझा हीरकमहोत्सवी महाराष्ट्र
- सोशल मीडिया चे फायदे व तोटे.
यापैकी कोणत्याही एका विषयावर लिहिणे आवश्यक आहे.
ज्या विद्यार्थ्यांना या निबंध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी त्या विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, इयत्ता, शाळेचे नाव व मोबाईल नंबर ही माहिती संघटनेचे उपाध्यक्ष प्रा अतुल निंगुरे यांचेकडे जमा करणे. यासाठी आपली माहिती मोबाईल नंबर ९८९ ०९३ २६०९ वर दिनांक ५ मे २०२० पर्यंत नोंदणी करावी.
ही नोंदणी विनाशुल्क आहे. सदरच्या निबंध स्पर्धेमध्ये निबंध जास्तीत जास्त १,००० ते १,५०० शब्दाचा असावा. निबंध लिहिताना पाठपोट पानावर लिहू नये व
फक्त मराठीत निबंध लिहिणे.
सदर लिहिलेला निबंध २० मे २०२० पर्यंत विवेकानंद अकॅडमी, ३१५२ ए वॉर्ड, राजोपाध्ये बोळ, जोतिबा रोड चौक, महाद्वार रोड, कोल्हापूर – ४१६ ०१२ येथे प्रत्यक्ष किंवा पोस्टाने पाठवण्याचा आहे.
सदर स्पर्धेचे बक्षीस
- प्रथम क्रमांकास रु. १,५०१ व प्रशस्तीपत्र ,
- द्वितीय क्रमांक रु. १,००१ व प्रशस्तीपत्र ,
- तृतीय क्रमांक रु. ७०१ व प्रशस्तीपत्र .
- तसेच उत्तेजनार्थ दोन बक्षिसे दिली जातील
तरी जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा ही संघटनेच्यावतीने आम्ही आपणास आवाहन करत आहोत.
संघटनेच्या वतीने या निबंध स्पर्धेसाठी एक उच्चस्तरीय मुख्याध्यापकांची कमिटी नेमलेली आहे. त्यांनी दिलेला स्पर्धेचा निकाल सर्वांनाच बंधनकारक राहील.
संघटनेचे अध्यक्ष प्रा. श्री .सुभाष देसाई , उपाध्यक्ष प्रा.श्री. अतुल निंगूरे , सचिव श्री.संजय वराळे ,श्री.संजय यादव, श्री.विकास काशिद , श्री.रंगराव जाधव ,श्री.बाजीराव जठार , श्री.निलेश बिरंजे , श्री.विवेक हिरवडेकर आधी कार्यकारिणी सदस्य
