कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून देशात सर्वाधिक तपासण्या केल्या जात आहेत. नुकत्याच नव्याने मंजूर करण्यात आलेल्या ३९ प्रयोगशाळांपैकी कोल्हापुरातील प्रयोगशाळा राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आजपासून सुरु करत आहोत.
यामुळे, आता कोल्हापूर जिल्हा कोरोना संशयितांची त्वरीत तपासणी करण्यासाठी स्वयंपूर्ण झाला आहे. ICMR च्या मार्गदर्शक नियमावली नुसार कोल्हापूरातच प्रयोगशाळा सुरु करावयाची परवानगी तात्काळ दिल्याबद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.अमित देशमुख यांचे मनापासून आभार.
सदर प्रयोगशाळा उभारणीसाठीचे अनुदान जिल्हा नियोजन मंडळातून देण्यात आले आहे. या प्रयोगशाळेमध्ये दिवसभरामध्ये 340 तपासण्या करण्यात येतील. यामुळे कोल्हापूर जिल्हयातील कोरोनाचा प्रसार रोखणे व पुढील प्रतिबंधात्मक उपायोजना राबविणे सोयीचे होणार आहे.
- ना. सतेज (बंटी) डी. पाटील
पालकमंत्री, कोल्हापूर