कोल्हापूर जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात विशेष विद्यार्थ्यांसाठी व बालकल्याणासाठी कायम कार्यरत असणार्या तसेच क्लीन कोल्हापूर व इतर सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असणार्या अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाइड कोल्हापूर व एबीइफ टीम तर्फे कोरोना महामारीच्या लढ्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राजर्षी शाहू ब्लड बॅंकेच्या स्टाफला व कोल्हापूर महानगरपालिकेच्या मेडिकल स्टाफला पीपीई किटसचे मोफत वाटप करण्यात आले.
या व्यतिरिक्त प्रशासनास मास्कवाटप सारखी इतर मदत देखील पालकमंत्री ना.सतेज पाटील यांच्या माध्यमातून अमिताभ फॅन्स क्लब वर्ल्डवाइड मदत करत आहे .
यावेळी अमिताभ फॅन्स क्लब चे सूर्यकांत पाटील बुदिहाळकर, ॲड. इंद्रजित चव्हाण, अमरदिप पाटील, डाॅ.शितल पाटील, युवराज राणिंगा उपस्थित होते.
Amitabh Bachchan, Amitabh Fans Club Worldwide, Amitabh Bachchan EF Team – World Wide



You must be logged in to post a comment.