सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपल्या सर्व शाळा बंद असल्याने, विद्यार्थी घरीच आहेत. नेमक्‍या परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना घरी रहावे लागत असल्याने शैक्षणिक नुकसान टाळता यावे, म्हणून ‘विद्या प्राधिकरण पुणे’ व ‘प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावती’ ने विकसित केलेल्या मोबाईल अँप चा वापर केल्यास विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे प्रश्नसंच सोडविण्याचा व गृहपाठ सराव पालकांना घरीच करून घेता येईल.

शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांनी हा मेसेज पालकांपर्यंत पाठवावा. गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या यंत्रणेमार्फत यासाठी पाठपुरावा करावा.

कोरोनाचा होतो आहे उद्रेक,
पण,
शिक्षणाला नका देऊ ब्रेक.


अ‍ॅप डाउनलोड करा