कोरोनमुक्त झालेल्या जिल्हातील पहिल्या रुग्णाच्या रक्तामधून प्लाझ्मा घेण्यात आला आहे. गंभीर व अस्वस्थ कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून उपचार करण्यात येणार आहेत. राज्यात कोल्हापूरमध्ये हा पहिलाच प्रयोग असणार असा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आय.सी.एम.आर.) कडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.